मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’

 मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’


मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्यांच्याकडे आज लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा जपायचा असेल, तर गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे तातडीने हटवायला हवीत. एकूणच गड-दुर्गांची संख्या, अतिक्रमणांची व्याप्ती, संवर्धनाची आवश्यकता हे सर्व पहाता गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे, यांसाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

या वेळी मराठा वॉरियर्स् गड-किल्ले संवर्धक (महाराष्ट्र राज्य) राहुल खैर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मुंबई विभाग धारकरी पुरूषोत्तम बाबर, शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)’चे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर भोसले आणि ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे निमंत्रक सागर चोपदार हे उपस्थित होते.’Gad-Durg Rakshakan Mahamorcha’ on March 3 in Mumbai
हा ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ शुक्रवार 3 मार्च या दिवशी दुपारी 12 वाजता ‘मेट्रो आयनॉक्स सिनेमा’ येथून आरंभ होऊन मोर्च्याचा शेवट ‘आझाद मैदान’ येथे होणार आहे.
या मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे 25 हून अधिक वंशज, यांसह विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.

ML/KA/PGB
1 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *