G20 शिखर परिषदेच्या पाहुण्यांना अस्सल वऱ्हाडी खाद्य पदार्थांची मेजवानी

 G20 शिखर परिषदेच्या पाहुण्यांना अस्सल वऱ्हाडी खाद्य पदार्थांची मेजवानी

नागपुर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  2023 मध्ये G20 परिषदेचे यजमानपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे आणि ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 21 आणि 22 मार्च रोजी नागपुरात C-20 या उपगटाच्या उपसमितीच्या बैठका होणार आहेत. 20 देशांचे पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने संपूर्ण शहर सजवण्यात आले आहे. अशाप्रकारे या देश-विदेशातील पाहुण्यांना प्रख्यात मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेले खास मराठमोळे पदार्थ अनुभवायला मिळणार आहेत. G20 Summit guests feast on authentic Bharwadi food

‘वसुधैव कुटुम्बकम्’ या प्रमाणे देश विदेशातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुठलीही उणीव भासू नये यासाठी सर्वतोपरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जी 20 साठी आलेल्या पाहुण्यांना अस्सल मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी असणार आहे. त्यासाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे त्यात खास वैदर्भीय खाद्य पदार्थांच्या मेनुचा भरणा असून तब्बल 97 मेनू तयार करण्यात येणार आहेत.

पाहुण्यांसाठी खास कार्यक्रम

पाहुणे 19 मार्चला संध्याकाळी विमानतळावर पोहोचतील. पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय खास भंडारा तुतीची रेशीम चोरलेली वस्तू भेट म्हणून दिली जाणार आहे. या स्टॉलवर इंग्रजी आणि मराठीमध्ये G-20 आणि C-20 असे लिहिलेले आहे. पाहुण्यांना संत्र्याचा रस आणि संत्र्याची बर्फीही दिली जाईल.

हे पदार्थ खास आकर्षण

विष्णू मनोहर सांगतात की, विदेशी पाहुण्यांच्या भोजनाची जबाबदारी ईश्वराच्या कृपेने मला मिळाली असून ही अतिशय आनंदायी बाब आहे. जगप्रसिद्ध सावजी मटण, चिकनचे प्रकार, मात्र सावजी हे झणझणीत असतं तर या पाहुण्यांसाठी माईल्ड स्वरूपाचे सावजी असणार आहे. विदर्भातील भरडा भात, वडा भात, कोथिंबीर वडी, पटोडी वडी, पतोडी रस्सा, शेवभाजी, चंद्रपूरचा वाडा,साबुदाणा वडा, आलूबोंडा असे नानाप्रकराचे मेनू असणार आहे. सोबतच 13-14 प्रकारच्या मिठाई असणार आहेत.

शाही बैठकीची पंगत असणार

विदेशी पाहुण्यांना अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन व्हावं यासाठी शाही बैठकीची पंगत असणार आहे. त्यात चांदीच्या ताटात पंचपकवान वाढण्यात येणार आहे. या सगळ्या मेजवानीचे तयारी आतापासून सुरू झाली असून हा मेजवानीचा सोहळा अविस्मरणीय ठराव यासाठी अमाची संपूर्ण चमू कामाला लागली आहे, अशी माहिती प्रसिध्द मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.

पारंपरिक पद्धतीने होणार स्वागत

19 मार्च रोजी सायंकाळी पाहुण्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. पाहुण्यांना फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. या शिवाय खास तयार करून घेतलेले भंडारा मलबेरी सिल्कचे स्टोल भेट म्हणून देण्यात येणार आहे. या स्टोलवर इंग्रजी आणि मराठीत जी-20 व सी-20 असे लिहिलेले आहे. पाहुण्यांना संत्रा ज्यूस आणि संत्रा बर्फीही भेट दिली जाईल.

महिला पाहुण्यांसाठी खास भेट

20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता हे विदेशी पाहुणे फुटाळा येथे संगीत कारंजाचा खेळ पाहाणार आहेत. तिथून ते तेलंगखेडी बगिच्यात येतील. बगिच्यात गोंधळ, लावणी व चिटकोर इत्यादी सारखे कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी मोगरा आणि चमेलीच्या गजऱ्याचे स्टॉल राहाणार आहे. या शिवाय महिलांसाठी मेहंदी आर्टिस्टही राहाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.

ML/KA/PGB
19 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *