राज्यातील शेतकऱ्यांना देणं असलेला निधी ३१ मार्चपूर्वी
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवर्षण , अतिवृष्टी ग्रस्त , सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आणि नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना देय असणारी उर्वरित मदतीची रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा विषय उपस्थित केला होता. नियमित कर्ज फेडणारे सुमारे बारा लाख शेतकरी यांना आजवर चार हजार सातशे कोटी अदा करण्यात आले आहेत, अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहा हजार कोटी रुपये दिली आहे, त्यातले सुमारे आठशे कोटी देणे बाकी आहे, सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सातशे पंचावन्न कोटी दिले आहेत, तीन हजार तीनशे कोटींची अधिक ची मागणी आली आहे त्याची तांत्रिक तपासणी सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी दिली होती.
अमरावती जिल्ह्यात नदीचे पाणी गावांमध्ये शिरून होणाऱ्या नुकसानीवर उपाय योजना केल्या जात आहेत, अशा प्रकारच्या नुकसानग्रस्त लोकांना ६.६८ कोटी रक्कम देण्यात आली आहे अशी माहिती प्रभारी मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिली , हा मूळ प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला होता.
ML/KA/SL
28 Feb. 2023