पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला
इस्लामाबाद,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान,, माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. (Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near his long march container)
या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याविषयी तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले होते. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार होते. यामध्येच हा हल्ला करण्यात आला आहे.
SL/KA/SL
3 Oct. 2022