विदेशी नागरिकाला अटक

 विदेशी नागरिकाला अटक

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी नागरिकाला 55 ग्रॅम एमडी आणि 12 ग्रॅम कोकेनसह पकडले आहे.चार्ल्स न्जोकू सॅम्युअल (वय 40)असे या विदेशी नागरिकांचे नाव असून तो मूळचा नायजेरीयाचा रहिवाशी आहे .सद्या तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत होता.

व्हॅलेंटाईनच्या दिवशी शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या कांदिवली अमली पदार्थ विरोधी पथकाला चार्ल्स न्जोकू सॅम्युअल हा विदेशी नागरिक बोरिवली येथील रुस्तुमजी इराणी रोड जंक्शन, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अमली पदार्थाची तस्करी करताना आढळून आला .पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता,त्याच्या कडे 11 लाखाचे 55 ग्रॅम एमडी आणि 4 लाख 80 हजारांचे 12 ग्रॅम कोकेन सापडले आहे .Foreign national arrested

आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची एकूण किंमत 15 लाख 80 हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस ऍक्ट अन्वेय गुन्हा दाखल करून चार्ल्स सॅम्युअल यास अटक केली आहे. यापूर्वी चार्ल्सवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ML/KA/PGB
15 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *