फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने या ही क्षेत्रात रचला इतिहास

 फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने या ही क्षेत्रात रचला इतिहास

कतार, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कतार येथे पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक सामान्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना फुटबॉल जगतात घडली आहे. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने हा इतिहास रचला आहे.Football player Lionel Messi created history in this field

यंदा अर्जेंटिनाने तब्बल ३७ वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या आनंदात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टवर त्याला इन्स्टाग्रामच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ७ कोटींहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. त्यामुळे गेले काही दिवस लिओनेल मेस्सीच्या या ही ऐतिहासिक कामगिरीची चर्चा होत आहे. Football player Lionel Messi created history in this field
या पोस्टमध्ये मेस्सीने लिहिले आहे की ;
” मी खूप वेळा ते स्वप्न पाहिले, मला ते इतके हवे होते की मी अजूनही पडलो नाही, माझा यावर विश्वास बसत नाही..
माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आम्‍ही पुन्‍हा एकदा दाखवून देतो की अर्जेंटीनाच्‍या लोकांनी एकत्र लढल्‍यावर आणि संघटित झाल्‍यावर आम्‍ही जे करण्‍याचे ठरवले आहे ते साध्य करण्‍यास समर्थ आहोत. गुणवत्तेची पात्रता या गटाची आहे, जो व्यक्तित्वापेक्षा वरचा आहे, त्याच स्वप्नासाठी सर्व लढण्याची ताकद आहे जे सर्व अर्जेंटिनांचे स्वप्न होते… आम्ही ते केले!!! ”

या पोस्टबरोबर मेस्सीने वर्ल्ड कप वितरण सोहळ्यातील काही क्षणचित्रे शेअर केली आहेत.Football player Lionel Messi created history in this field

ML/KA/PGB
22 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *