बदलापुरमध्ये भाजप आमदाराच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर, दि. ३ : भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर शहरातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची काही दृश्य समोर आली आहे. दोन गटातील अपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचानामा केला जातोय.
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर असणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. दोन गटात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद इतका वाढला की थेट गोळीबाराला सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख नावाचा व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली जात आहे.