अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

 अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाघ नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाघ नखे भारतात आली आहेत. सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथून खास विमानाने मुंबई येथे सकाळी दाखल झाली. त्यानंतर ही वाघनखे सातारा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत .

या वाघनख्यासाठी बुलेटप्रूफ काचेची पेटी तयार करण्यात आलेली असून सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्यावत सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे. 19 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत .

कस्टम विभागाचे अधिकारी आणि सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात लंडनहून आलेली वाघ नखे साताऱ्याकडे नेली जात आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजता ही वाघ नखे दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाघ नखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही वाघ नखे साताऱ्यासाठी रवाना झाली आहेत.

SL/ML/SL

17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *