अखेर कशेडी बोगद्याला गणपती बाप्पा पावला…

 अखेर कशेडी बोगद्याला गणपती बाप्पा पावला…

अलिबाग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची ग्वाही देण्यात येत असली तरी महामार्गाच्या कामाबद्दल अद्याप आनंदी आनंद आहे. मात्र या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ आठ मिनिटात यशस्वी झाली आहे त्यामुळे गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल. Kashedi tunnel…

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे आज बोगद्यातून हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली गेली आहे. अवघड वळणांच्या कशेडी घाटाला पर्याय असलेल्या या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीची गेल्या कित्येक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 

या बोगद्याचे प्रवेशद्वार हे तिरंग्याने रंगवण्यात आले आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला रत्नागिरी आणि रायगड पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली आहे. 
कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे.

त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा चाळीस मिनिटांचा वेळ आता केवळ आठ ते दहा मिनिटांवर आला आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे.
बोगद्यातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून बोगद्यामध्ये लाईट बसवण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

रस्त्यावरही ‘कॅट आय’ बसवण्याचे कामही करण्यात आले आहे.
बोगद्यामध्ये प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर आपत्कालीन प्रसंगात वाहन बाजूला घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या बोगद्याचे काम रिलायन्स आणि शिंदे कंपनी करत आहे. या सगळ्या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून लक्ष ठेवले जात आहे.

ML/KA/PGB
12 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *