FII खरेदीने बाजाराला (Stock Market) दिलासा

 FII खरेदीने बाजाराला (Stock Market) दिलासा

मुंबई, दि. 18 (जितेश सावंत):   १७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने चांगली वाढ नोंदवली.महत्त्वाचे मॅक्रो इकॉनॉमिक आकडे जाहीर होऊन पुढील दर वाढीबद्दल वाढणारी चिंता निर्माण होऊन देखील दीर्घ काळानंतर FII खरेदीने बाजाराला थोडा दिलासा दिला. काही काळ बाजार एका ठराविक पातळीभोवती फिरत राहील. गुंतवणूकदारानी सेक्टर तसेच स्टॉक स्पेसिफिक राहून गुंतवणूक करावी.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष FII च्या वाटचालीकडे असेल.
Technical view on nifty-या आठवड्यात .निफ्टीने 17853-17795-17774-17761-17723 हे स्तर राखणे जरुरी आहे. वर जाण्याकरिता निफ्टीला 18035-18053-18134-18163 हे स्तर पार करावे लागतील हे स्तर पार केले तर निफ्टी 18200-18252 पर्यंत पोहोचू शकते

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.Market falls for the second day in a row.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात सपाट नोटवर झाली परंतु लगेचच बाजाराचा ताबा बेअर्स/मंदीवाल्यानी घेतला आणि निफ्टीला 17,700 च्या जवळपास खेचले तथापि, अंतिम तासात झालेल्या खरेदीमुळे इंट्राडे तोटा काहीसा पुसून टाकण्यास मदत झाली.बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. या आठवड्यात तिसर्‍या तिमाहीच्या कमाईचा हंगाम संपुष्टात येणार असल्याने बाजारात कमकुवतपणा जाणवला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 60,431 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 85अंकांची घट होऊन निफ्टीने 17,770 चा बंद दिला.

सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला.Sensex up 600 points

मंगळवारी संमिश्र जागतिक संकेत होते तरीही देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी मजबूत झाला.बाजारात शॉर्टकव्हरिंग दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 600 अंकांनी वधारून 61,032 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 158 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,929 चा बंद दिला.FII buying relieves the stock market

निफ्टीने पुन्हा १८,००० चा टप्पा केला पार.Nifty reclaims 18,000

कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजार खालच्या स्तरावर उघडला. परंतु लगेचच सुरुवातीचे नुकसान भरून काढले व सत्राचा बराचसा वेळ सपाट राहिला.पण अंतिम तासामध्ये ऑटो,रियल्टी आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे निर्देशांकांना दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ जाण्यास मदत झाली.सलग दुसऱ्या दिवशी बाजारात वाढ झाली. .परंतु यूएस चलनवाढ, मागील महिन्याच्या तुलनेत मंदावली असली तरी, अपेक्षेपेक्षा जास्त 6.4 टक्के YoY वर आली त्यामुळे आशियाई बाजारात घट झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 242 अंकांनी वधारून 61,275 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 86 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,015 चा बंद दिला.

सेन्सेक्स आणि निफ्टीचा शेवट हिरव्या रंगात झाला.Sensex, and Nifty concluded in green

सलग तिसऱ्या दिवशी बाजार वरच्या स्तरावर बंद झाला. बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली आणि सत्राचा बहुतांश भाग बाजार वरती राहिला, तथापि, शेवटच्या तासात ब्लू-चिप समभागातील विक्रीने दिवसातील बहुतांश नफा नष्ट झाला.दिवसभरात आयटी समभागांत तेजी झाली. तर तेल कंपन्यांना विंडफॉल कर कमी झाल्यामुळे फायदा झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 44 अंकांनी वधारून 61319 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,035 चा बंद दिला.

सेन्सेक्स ३१७ अंकांनी घसरला. Sensex down 317 points

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला.शेवटच्या तासांच्या खरेदीमुळे तोटा कमी झाला. कॅपिटल गुड्स वगळता सर्व क्षेत्रांतील विक्रीमुळे बाजाराने तीन दिवसांची विजयी मालिका खंडित केली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 317 अंकांनी घसरून 61,002 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 91 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,944 चा बंद दिला.
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
18 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *