गोसीखुर्द धरणाचे पंधरा दरवाजे उघडले…
भंडारा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तसेच धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसे धरणाच्या 33 दारांपैकी 15 दार अर्धा मीटरने उघडण्यात आले असून यामधून 1786 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येईल, तसेच आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होऊन तो 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल. तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सूचीत करावे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले आहे.
ML/ML/SL
18 July 2024