पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने शेतकरी समाधानी

धुळे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तब्बल महिनाभरापासून पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा सुखावला असून अक्कलपाडा परिक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने क्षेत्रात कृषी क्षेत्राबरोबरच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
धुळे जिल्ह्यात पांजरा नदीवरील लाटीपाडा कान नदीवरील मालनगाव आणि जामखेडी नदीवरील जामखेड येथील प्रकल्प 100% भरले असून येथील पाणी हे अक्कलपाडा प्रकल्पात येत असते यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून यावर्षी पहिल्यांदाच 0.5 मीटरने अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्यात येत असून 5000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे मांजरा नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय हातनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने सुलवाडे बॅरेजचे देखील एक दरवाजा एक मीटरने उघडण्यात आला आहे . प्रकल्पातून 350 क्युसेक पाणी तापी नदीत सुरू असून जवळपास जिल्हाभरातील सर्वच मंडळात पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यातील वारसा मंडळात 100 एम एम चा वर पाऊस झाला असून जिल्ह्यात तीन दिवसात सरासरी 60 मिली पाऊस झाला. जिल्ह्यातील चारही तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. साक्री तालुक्यात झालेला पाऊस हा भात पिकासाठी फायदेशीर ठरणार असून इतर ठिकाणी झालेला पाऊस देखील कृषी क्षेत्रात जीवदान ठेवणारा असणार आहे.Farmers are satisfied with the rains in the catchment area
ML/KA/PGB
10 Sep 2023