#शेतकरी आंदोलनाचा दिल्लीवर परिणाम, भाजीपाला आणि फळांचा पुरवठा प्रभावित !
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पाच दिवसांपासून सिंहू व टिकरी सीमेजवळील शेतकऱ्यांच्या निदर्शनांमुळे इतर राज्यातून दिल्लीला भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आझादपूर मंडईमध्येही त्याचा पुरवठा अर्धवटच होत आहे. मर्यादित पुरवठ्यामुळे हंगामी भाजीपाल्याचे दर 50 रुपयांवरून शंभर रुपयांवर गेले असल्याचे दिल्लीच्या इतर भागातील विक्रेत्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे कारण सिंहू व टिकरी सीमेवरील मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे.
आझादपूर येथील कृषी उत्पन्न पणन समितीचे अध्यक्ष आदिल खान म्हणाले की दिल्लीच्या सर्वात मोठ्या घाऊक बाजार आझादपूरमध्ये भाजीपाला व फळांचा पुरवठा निम्म्यावर आला आहे. खान म्हणाले की साधारण दिवसात आझादपूर मंडीमध्ये सुमारे 2500 ट्रक भाजीपाला व फळ इतर राज्यातून येतात. आता ही संख्या खाली आली आहे. पुढील काही दिवस सीमा बंद राहिल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. तसेच, ते म्हणाले की, स्थानिक उत्पादनांमुळे किंमतींमध्ये कोणतीही विशेष वाढ झालेली नाही आणि आधीच साठवलेली उत्पादने विकली जात आहेत.
दरम्यान, काही विक्रेत्यांनी सांगितले की, पुरवठा कमी झाल्यामुळे हंगामी भाजीपाल्याचे घाऊक दर 50 ते 100 रुपयांवर गेले आहेत. ते म्हणाले की, सीमेवर नाकाबंदी केल्यामुळे ट्रकला दिल्ली गाठण्यास अडचण होत असून काही ट्रक येत असली तरी त्यांना उशीर होत आहे. आझादपूर मंडीतील हिरव्या मटारचे व्यापारी गोपाल यांनी सांगितले की पंजाबच्या अमृतसर-होशियारपूर भागातून वाटाच्या 40 ते 50 ट्रक येतात पण आता केवळ 15 ते 20 ट्रक येत आहेत.
ओखला मंडी येथील घाऊक विक्रेते हकीम रहमान म्हणाले की, दिल्लीत बटाटा आणि कांद्याचा पुरवठा हा प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून होतो आणि शेतकरी आंदोलनामुळे या राज्यांच्या मार्गांवर कोणताही परिणाम झाला नाही. ते म्हणाले की, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधून भाज्या व फळांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
आझादपूर मंडीचे घाऊक फळ विक्रेता आर. के. भाटिया म्हणाले की, सफरचंदसारख्या फळांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, परंतु किंमत कमी-अधिक आहे. यावेळी काश्मिरमध्ये सफरचंदांचे उत्पादन चांगले झाले नाही, म्हणून आधीच किंमत जास्त आहे आणि मागणी कमी आहे.
HSR/KA/HSR/1 DEC 2020
Tag-vegitables/krushibill/protest