यूपीआय पेमेंटवर 1 जानेवारीपासून द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

 यूपीआय पेमेंटवर 1 जानेवारीपासून द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

नवी दिल्ली दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क)- यूपीआय पेमेंट चा वापर करणार्‍यांनी लक्ष द्या. 1 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉन, गुगल पे आणि पे फोन ची सेवा वापरण्यासाठी आपल्याला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 जानेवारीपासून थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोवाइडर्स द्वारे चालवल्या जाणार्‍या यूपीआय पेमेंट सेवेवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तानुसार एनपीसीआयने 1 जानेवारी 2021 पासून भारतात थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट यूजर्स च्या वापरावर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यानंतर असे मानले आहे की त्याचा वापर करणार्‍यांना त्याचा वापर करणे महाग ठरु शकेल.
कोणावर परिणाम होईल – एनपीसीआयच्या या निर्णयाचा परिणाम पेटीएमवर होणार नाही असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे आणि फोन पे सारख्या कंपनीच्या ग्राहकांवर याचा परिणाम नक्कीच होईल. परंतू कंपनीने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
निर्णय का घेतला- एनपीसीआयने हा निर्णय यूपीआय पेमेंट सिस्टममध्ये भविष्यकाळात तृतीय पक्षाची (थर्ड पार्टी) मक्तेदारी रोखण्यासाठी घेतला आहे. या अॅप्सद्वारे वापरकर्त्यांना स्वस्त सेवा दिली जात होती, त्यानंतर एनपीसीआयने हे पाऊल उचलले आहे.
गूगल पे ने घेतला हा निर्णय- याआधी गुगल पे ने एका निर्णयामध्ये म्हटले आहे की त्वरित पैसे हस्तांतरण केल्यावर ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. मात्र हा निर्णय भारतात लागू होणार नाही.
Tag- upi payment/ extra charge/ 1 Jan
PL/KA/HSR/1 DEC 2020

mmc

Related post