वाढत्या महागाईच्या चिंतेने भांडवली बाजारात (Stock Market) घसरण.
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
गेला संपूर्ण आठवडा बाजारासाठी चिंताजनक ठरला. आठवड्याचे कामकाज हे फक्त तीन दिवसांचेच होते. गुरुवारी व शुक्रवारी बाजार बंद होते.बाजारात प्रचंड चढउतार दिसले.बाजारासाठी प्रमुख चिंतेचे कारण ठरले ते म्हणजे वाढती महागाई. जगभरातील देशात महागाईने कहर केला असून त्याचे पडसाद बाजारावर उमटताना दिसले. त्याचबरोबर चौथ्या तिमाहीचे निकाल, ECB बैठक, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, बॉण्ड यील्ड मधील वाढ,रशियावरील नवीन निर्बंध, रशिया-युक्रेन शांतता चर्चेचा शून्य परिणाम, इंधनाच्या वाढत्या किमती, चीन मधील महत्वाच्या शहरातील झपाटयाने वाढतअसलेली कोरोनाची रुग्णसंख्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम या आठवड्यात बाजारावर जाणवला. भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी घसरले.
गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील आठवड्यात चौथ्या तिमाहीचे निकाल, रुपयाची वाटचाल ,विदेशी गुंतवणूकदारांचे खरेदी/विक्रीचे आकडे याकडे राहील.
तांत्रिकदृष्ट्या बाजार थोडा कमजोर आहे. निफ्टीसाठी १७,४००-१७३०० हे स्तर महत्वाचे ठरतील हे स्तर तोडल्यास बाजार अजून घसरण्याची शक्यता आहे. तसेच वर जाण्याकरिता निफ्टीने १७,५०० व १७,६०० चा स्तर तोडणे आवश्यक ठरेल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा या वर्षीचा पहिला अंदाज जाहीर केला व या वर्षी देशात चांगला पाऊस पडेल असे मत व्यक्त केले.IMD forecasts ‘normal’ monsoon.
India’s inflation surged to a 17-month high of 6.95 percent in March for the third consecutive month.
आयटी समभागांमुळे बाजारात घसरण. Market dragged by IT stocks
मागील सत्रातील तेजीनंतर आठवड्याच्या सुरवातीलाच बाजाराची सुरुवात कमजोर झाली.आशियाई बाजारातील नरमाईचा फटका भारतीय बाजाराला बसला.गुंतवणूकदार जोखीम असल्येल्या समभागातून बाहेर पडताना दिसले.चौथ्या तिमाहीच्या निकालांची सुरवात TCSच्या निकाला पासून सुरु होणार असल्याने आयटी समभागांनी बाजारावर सर्वाधिक दबाव टाकला. टीसीएसच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारांनी टेक्नॉलॉजी स्टॉकमधील आपली स्थिती हलकी केली.ECB बैठक, यूएसचे महागाईचे आकडे ,आणि देशातील चौथ्या तिमाहीच्या निकालाच्या सुरुवातीपूर्वी बाजाराने सावध भूमिका घेतली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४८२ अंकांनी घसरून ५८,९६४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १०९ अंकांची घसरण होऊन १७,६७५ चा बंददिला.
दुसऱ्या दिवशीही बाजारात घसरण.Market falls for the second day
मंगळवारी बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. आयटी, मेटल, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि कॅपिटल गुड्स या समभागांनी बाजारावर दबाव आणला. परंतू बँकिंग समभागांतील खरेदीने बाजाराची दिवसाच्या निचांकीतून सावरण्यास मदत केली. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक खर्चात कपात होणार याची चिंता गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली.बाजाराने उघडताना १७,६००ची महत्त्वपूर्ण पातळी तोडली. रिअल इस्टेट आणि मेटल निर्देशांक २. ५ टक्क्यांहून अधिक घसरले. चीन मध्ये महत्वाच्या शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाटयाने वाढत होती त्याचा फटका बाजाराला बसला.दिवसभरात बाजारासाठी फक्त एक चांगली आली, खाजगी हवामान अंदाज कंपनी Skymet ने २०२२ मध्ये पाऊस चांगला पडेल अशी बातमी दिली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३८८ अंकांनी घसरून ५८,५७६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४४ अंकांची घसरण होऊन १७,५३०चा बंददिला.
दोन दिग्गज आय.टी कंपन्यांचे निकाल जाहीर झाले.
TCS net profit up 7.4%, revenue hits ₹50,000 cr-mark
Infosys Q4 profit misses estimates but full-year revenue guidance beats expectations
महागाईच्या चिंतेने बाजार खाली. Inflation worries pull market down
कामकाजाच्या शेवटच्या दिवशी आणि सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारात विक्रीचा जोर राहिला.महागाईच्या चिंतेमुळे बाजारावर दबाव राहिला.बाजारात प्रचंद चढउतार दिसला. बाजारात वरच्या पातळीवर नफावसुली पाहावयास मिळाली. ब्रिटनचा महागाईचा दर ६.२ टक्क्यांवरून मार्चमध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढल्याने त्याने तीन दशकांतील उच्चांक गाठला.यूएस मधील महागाईच्या दर गेल्या वर्षभरात प्रचंड वेगाने वाढला त्याने ४० वर्षांपेक्षा जास्त उच्चांक गाठला. आपल्या देशातील महागाईने सुद्धा नवा विक्रम नोंदवला किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्क्यांवर पोहोचला १७ महिन्यातील उच्चांक गाठला. बाजाराला महागाईतील वाढीची अपेक्षा असली तरी समोर आलेले आकडे हे अपेक्षित नसल्याने गुंतवणूकदार धास्तावले. या कारणांमुळे बाजारात विक्रीचा मारा सुरूच होता. बाजार दोन दिवस बंद राहणार असल्याने गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ५८,३३८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत५४ अंकांची घसरण होऊन १७,४७५ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
ML/KA/PGB
16 Apr 2022