मदरशातून १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
भोपाळ, दि. ३ : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मदरशातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे महाराष्ट्रातील मालेगावशी कनेक्शन असल्याची माहितीही समोर येत आहे. खांडवा जिल्ह्यातील जवार पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात असलेल्या या मदरशातून आतापर्यंत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलवी आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बनावट नोटांच्या अनुषंगाने आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे बोलले जाते. बनावट नोटांच्या टोळीचे कनेक्शन महाराष्ट्रापासून मध्य प्रदेशपर्यंत आहे.
सुरुवातीच्या मोजणीत १२ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या, परंतु पोलिसांचा अंदाज आहे की एकूण रक्कम १६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असू शकते. पोलिसांकडून मोजणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या पोलिसांनी अशरफ अन्सारीचा मुलगा झुबेर आणि त्याच्या एका साथीदाराला १० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला. अटकेनंतर चौकशीत झुबेरने तो खंडवा येथील पैठियान गावातील एका मशिदीचा मौलवी असल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच महाराष्ट्र पोलिसांनी खांडवा पोलिसांशी संपर्क करून त्यांना अलर्ट केले. खांडवा पोलिसांच्या पथकाने तत्काळ मदरशावर छापा टाकला आणि शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झुबेर हा मदरशाच्या वरच्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहत होता. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली तेव्हा बनावट चलनांचा गठ्ठा सापडला.
SL/ML/SL