Online Gaming मध्ये जिंकलेल्या रक्कमेवर आता आकारला जाईल एवढा कर

 Online Gaming मध्ये जिंकलेल्या रक्कमेवर आता आकारला जाईल एवढा कर

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट सध्या वाढत आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्प 2023 मध्ये गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या (Tax Deducted at Source) नियमाबाबतही मोठा बदल करण्यात आला आहे.

सध्या ऑनलाइन गेममध्ये  पैसे जिंकणाऱ्या व्यक्तीला 10000 हजारांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के TDS भरावा लागतो. मात्र आता   1 एप्रिल 2023 पासून ऑनलाइन गेमिंगमध्ये जिंकलेल्या कोणत्याही रक्कमेवर आता टीडीएस भरावा लागणार आहे.

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी सरकारकडे टीडीएस कमी करण्याची मागणी केली होती. मात्र ती मागणी नाकारून सरकारने आता गेमिंग मधुन जिंकलेली सर्व रक्कम कराच्या अखत्यारित आणली आहे.

 याबरोबरच आयकर रिटर्न (ITR) भरताना इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अंतर्गत ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या रकमेची माहिती देणे आवश्यक करण्यात येणार आहे.

SL/KA/SL
2 Feb 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *