दुष्काळग्रस्त भागातील मदतीसाठी ई केवायसीला मुदतवाढ

 दुष्काळग्रस्त भागातील मदतीसाठी ई केवायसीला मुदतवाढ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यातील लाभार्थ्यांना उर्वरित मदत वितरित करण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य आहे , शेवटच्या शेतकऱ्याची ई – केवायसी पूर्ण होईपर्यंत यासाठीची मुदत वाढवण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं .

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान निविष्ठा मिळण्याबाबतचा तारांकित प्रश्न रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला होता त्याला पाटील यांनी उत्तर दिलं. येत्या १५ दिवसात मोहीम राबवून लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण करून घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

9 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *