देशात २०२३ मध्ये बांबू पासून इथेनॉईल निर्मितीला सुरुवात

 देशात २०२३ मध्ये बांबू पासून इथेनॉईल निर्मितीला सुरुवात

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पंप सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तांदूळ, ऊस पासून इथेनॉल उत्पादन सुरू असून आसामसह देशातील अनेक प्रांतात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना बांबूचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आसाम मध्ये बांबूपासून इथंनाईल निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू असून २०२३ पर्यंत आसाम मध्ये बांबू पासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे.Ethanol production from bamboo started in the country in 2023

बांबूपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातही उभे करणार असल्याचे प्रतिपादन आज पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांनी नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पेट्रोलियम, नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज नाशिकच्या गेटवे हॉटेल येथे राज्यातील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला, या बैठकीस भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, नयारा, रिलायन्स आणि सेल या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

देशाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी देशात प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी स्टेशन सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे तेली यांनी सांगितले, महिलांना घरातील गॅस संपण्याचा त्रास नको म्हणून प्रत्येक घरात गॅस लाईन टाकून घराघरात गॅस पोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले.

ML/KA/PGB
28 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *