महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

 महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला स्वतःचे बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण हे विधेयक संमत करुन कायदा करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध व अनुषांगिक साहित्य खरेदीसाठी व पुरवठा पद्धती गतीमान व सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना झाली आहे.

या औषध खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागातर्गंत येणाऱ्या सर्व साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. त्यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवून राज्यातील 4 कोटी 39 लाख महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्याशिवाय २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मेळघाटातील कुपोषणावर मात करण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना सुविधा, उपचार करण्याचे कामही हाती घेतले आहे. मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सांवत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या प्रभावी कामगिरीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पुरस्कार विभागाला मिळाले आहेत. गोवर संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करून गोवर रोखण्यासाठी कालबद्ध लसीकरण मोहीम राबवून गोवर नियंत्रणात आणला. त्यासोबतच कोविड काळात काम करणाऱ्या ५९७ परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत भरती करण्याचा निर्णय घेत राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यातील शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यातील आरोग्य सुविधा नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा आरोग्य मंत्र्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

राज्यात सन २०१७ पूर्वी औषध, कन्झुमेबल्स उपकरणे व यंत्रसामुग्री तसेच इतर अनुषंगिक वस्तुची खरेदी प्रत्येक विभागाकडून करण्यात येत होती. राज्यात वेगवेगळ्या संस्थांकडून खरेदी करण्यात येत असल्याने वेगवेगळे दर प्राप्त होत होते. दरामध्ये एकसुत्रता आणण्यासाठी व एकत्रित संख्येच्या खरेदीचा न्युनतम दरासाठी फायदा मिळावा यासाठी २६ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित अंर्तगत खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला होता. एकत्रित साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी हाफकीनची होती, त्यांच्याकडील ६० टक्के खरेदीचा सरासरी भार आरोग्य विभागाचा आहे. या हाफकीन महामंडळ मर्यादित सुरु असलेल्या साहित्य खरेदी व वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व अन्य विभागाच्या औषध व अनुषांगिक साहित्य खरेदीसाठी व पुरवठा पद्धती गतीमान व सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रधिकरणाकडून करण्यात येणारी खरेदी धोरणानुसार करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलच्या कार्यपद्धतीचा अवलंब यात करण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांच्या काळात आरोग्य विभागाशी संबधित निर्णय घेत आरोग्य विभागातील सेवा, सुविधा शाश्वत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे भविष्यात आरोग्य विभागाचे काम शाश्वत प्रणालीमुळे अविरतपणे करणे शक्य होणार आहे. या प्रधिकरणाच्या निर्मितीसाठी दोन वर्षाला आस्थापना बांधकाम इतर खर्चासाठी अंदाजित ६५१९.५८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.

काय आहे वैद्यकीय खरेदी प्राधिकरण
आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, औषधी द्रव्ये विभागाकडील रुग्णालयाकरीता –
 औषधे
 औषधी साहित्य
 यंत्रसामुग्री
 वैद्यकीय उपकरणे
 सोनोग्राफी मशीन
 डायलेसीस मशीन
 व्हेंटिलेटर
 सीटी स्कॅन मशीन
 फर्निचर

हे या प्राधिकरणामार्फत खरेदी करता येणार आहे, याचे आरोग्य खात्याच्या आठ विभागात गोडावून असणार आहेत. खासगी औषध विक्रेता, खासगी वैद्यकीय व्यवासायिक, डॉक्टर याठिकाणी औषध खरेदी करू शकणार आहेत. केंद्रसरकारच्या यंत्रणाही या माध्यमातून याठिकाणी खरेदी करू शकणार आहेत. इतर राज्यातील आरोग्य विभाग, खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्सही या ठिकाणी औषधांची तसेच वैद्यकीय उपकरणे आणि वस्तूंची खरेदी करु शकतील.

यामुळे काय फायदा होणार

आरोग्य खात्याला स्वता:चे बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू होईल. या उत्पन्नातून जमा होणाऱ्या निधीमधून राज्यातील आरोग्य सुविधेवर खर्च करणे शक्य होणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न औषध प्रशासन या तीन विभागाचा सहभाग असणार आहे. आरोग्य खात्याला सध्या भेडसावत असलेल्या निधीची कमतरता या माध्यामातून कमी होऊ शकते.

प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार मुख्यमंत्री

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असणार आहेत. त्यासोबतच आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे उपाध्यक्ष असणार आहेत. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न औषध प्रशासन तीन खात्याचे राज्यमंत्री हे प्राधिकरणाचे सदस्य असणार आहेत.

हाफकीनला देणार नवसंजीवनी (चौकट)
गेल्या काही दिवसांपासून हाफकिन इन्स्टिट्यूटला त्यांच्या औषध व लस निर्मिती आणि त्यावरील संशोधन या मूळ उद्दिष्टापासून दूर ठेवण्यात आले होते. कोरोना काळात हाफकीनला लस निर्मितीचे अधिकार मिळाले असते तर राज्य शासनाला त्याचा अधिक फायदा झाला असता. मात्र, औषध खरेदी किंवा विक्री करणे हे हाफकीनचे उद्दिष्ट नसून गंभीर आजारावर व सर्पदंशावर लस संशोधन आणि औषध निर्मिती करणे हे त्यांचे मूळ काम आहे. या कामाला अधिक गतिमान करून औषध व लस निर्मितीसाठी प्रयत्न करण्याकरिता हाफकिनला नव संजीवनी देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

खरेदी व पुरवठा प्रक्रियेत सहभागी विभाग

  1. खरेदी विभाग
     औषधे व औषधी साहित्य विभाग
     यंत्रसामुग्री, उपकरणे व टर्न-की प्रकल्प विभाग
     इतर रुग्णालयीन साधनसामुग्री व सेवा विभाग
     भांडार व्यवस्थापन विभाग
  2. माहिती तंत्रज्ञान विभाग
  3. लेखा विभाग व लेखा परीक्षण
  4. मनुष्यबळ कक्ष/ सेवा कक्ष / आस्थापना विभाग
  5. कार्यान्वयानुसार विभाग स्थापन करण्याची मुभा प्राधिकरणास राहिल

प्राधिकरण नियामक मंडळाची संरचना (चौकट)

  1. मा.मुख्यमंत्री- अध्यक्ष
  2. मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) – उपाध्यक्ष
  3. मा.मंत्री (वैद्यकीय शिक्षण ) – उपाध्यक्ष
  4. मा.मंत्री (अन्न व औषध प्रशासन ) – उपाध्यक्ष
  5. मा.राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) -सदस्य
  6. मा.राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण ) – सदस्य
  7. मा.राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन ) – सदस्य
  8. मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन – सदस्य
  9. अ.मु.स/प्र.स./सचिव-1 , सार्वजनिक आरोग्य विभाग – सदस्य
  10. अ.मु.स/प्र.स./सचिव-2 , सार्वजनिक आरोग्य विभाग – सदस्य
  11. अ.मु.स/प्र.स./सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – सदस्य
  12. अ.मु.स/प्र.स./सचिव , उद्योग उर्जा व कामगार (उद्योग) विभाग – सदस्य
  13. अ.मु.स/प्र.स./सचिव, (वित्त) वित्त विभाग – सदस्य
  14. अ.मु.स/प्र.स./सचिव , (नवि-2) नगरविकास विभाग -सदस्य
  15. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ.अ.- सदस्य
  16. मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय खरेदी प्राधिकरण- सदस्य सचिव

प्राधिकरणाची कार्यकारी समिती:-

१. मुख्य सचिव अध्यक्ष
२. अ.मु.स./ प्र.स / सचिव-१, सार्वजनिक आरोग्य विभाग- सदस्य
३. अ.मु.स./ प्र.स / सचिव-२, सार्वजनिक आरोग्य विभाग- सदस्य
४. अ.मु.स./ प्र.स / सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – सदस्य
५. अ.मु.स./ प्र.स / सचिव उद्योग ऊर्जा व कामगार (उद्योग) विभाग-सदस्य
६. अ.मु.स./ प्र.स / सचिव, (वित्त) वित्त विभाग-सदस्य
७. अ.मु.स./ प्र.स / सचिव, (नवि-२) नगर विकास विभाग-सदस्य
८. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ.अभियान- सदस्य
९. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन- सदस्य
१०. संचालक-१, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई – सदस्य
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण- सदस्य सचिव

प्राधिकरणासाठी पदभरती:-

(अ) प्राधिकरणाची रूपरेषा :-
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या प्रशासकीय संनियंत्रणाखाली कार्य करेल. त्याकरीता खालीलप्रमाणे पदे उपलब्ध करण्यात येत आहेत:-

(१) मुख्य कार्यकारी अधिकारी -१ पद (भा.प्र.से. अधिकारी)
(२) चीफ / जनरल मॅनेजर (तांत्रिक) १ पद (सार्व. आरोग्य विभागामधील सहसंचालक दर्जाचा अधिकारी)
(३) चीफ / जनरल मॅनेजर (प्रशासन) १ पद (सहसचिव दर्जाचा अधिकारी)
(४) असिस्टंट जनरल मॅनेजर (तांत्रिक)- २ पदे (सार्व आरोग्य विभाग उपसंचालक दर्जाचा अधिकारी)
(५) असिस्टंट जनरल मॅनेजर ( तांत्रिक) डिएमइआर मधील डीन संवर्ग- १ पदे
(६) तांत्रीक अधिकारी (सार्व. आरोग्य विभाग सहाय्यक संचालक दर्जाचे अधिकारी-४ पदे
(७) असिस्टंट जनरल मॅनेजर ( तांत्रिक)- २ पदे (डिएमइआर अंतर्गत प्रोफेसर /असोसिएट प्रोफेसर संवर्ग
(८) मुख्य लेखा व वित्त अधिकारी (लेखा) १ पद (वित्त विभागाच्या अधिपत्याखाली वित्त व लेखा सवर्गातील सहसंचालक दर्जाचा अधिकारी)
(९) मुख्य प्रशासकिय अधिकारी (प्रशासन)- १ पद (अवर सचिव संवर्गातील अधिकारी)

वरील ०९ संवर्गातील १४ पदे प्रतिनियुक्तीने किंवा सेवा अधिग्रहित करून भरण्यात येतील.
वरील पदाव्यतिरिक्त कंत्राटी स्वरुपात उपलब्ध करावयाची पदे महामंडळ सेवा पुरवठादाराची नेमणुक करुन त्यांच्याकडुन एकत्रित मानधनावर मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल.

(ब) महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणासाठी कंत्राटी कर्मचारी :-
खालील विविध प्रकारची पदे कंत्राटी पद्धतीने प्राधिकरणाच्या स्तरावर निविदा प्रक्रीया राबवून सेवा पुरवठादाराची नेमणूक करता येईल. नियमित अधिकारी कर्मचारी यांचे वेतन, कंत्राटी कर्मच्याऱ्यांचे वेतन व आस्थापना खर्च भागविण्यासाठी प्रथम दोन वर्षासाठी सदर प्राधिकरणास सहयक अनुदानाचे लेखाशिर्ष निर्माण करुन अनुदान देणे आवश्यक आहे.
(1) Pharmacy Officer / Procurement Officer – 15
(2) Data Entry Operator cum Accountant-20
(3) Biomedical Engineer -5
(4) Mass Media Consultant -1
(5) Legal Consultant-3
(6) Engineer (Civil)-2
(7) Engineer (Electric)-1
(8) Architect-1
(9) IT Cell – (a) Programmer-2, (b) Developer- 1, (c) Data Manager-1

(क) इतर अन्य पदे निर्माण करण्याची मुभा महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणास राहील.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *