भारतीय गिधाडांच्या लुप्त होणाऱ्या जाती उपचारासाठी दाखल
नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लुप्तप्राय होत असलेल्या लाँग बिल्ड Vulcher अर्थात भारतीय गिधाडे प्रजातीच्या दोन गिधाडांवर नागपूरच्या ट्रांजीट ट्रीटमेंट सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत.
ही गिधाडे IUCN च्या रेड लिस्ट अनुसार गंभीर प्रकारे लुप्त होणाऱ्या प्रजाती मध्ये आहेत. एकाला गोंदिया विभागातून आणण्यात आलेले आहे तर दुसरे गिधाड नागपूर जवळच्या पारडी भागातून आणण्यात आलेले आहे. यांना खायला न मिळाल्याने ते अशक्त पडलेले होते. नागपूरच्या ट्रांजीट ट्रीटमेंट सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना खायला देण्यात येत आहे लवकरच त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाणार आहे.
ML/KA/SL
11 Aug 2023