Elon Musk लवकरच लाँच करणार रोबोटॅक्सी

 Elon Musk लवकरच लाँच करणार रोबोटॅक्सी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार उत्पादन करणारी कंपनी टेस्ला आणि तिचा मालक Elon Musk हा कायम चर्चेत असतो. आता एलन मस्क त्याच्या रोबोटॅक्सीवर लक्ष देत आहे. मस्क त्याची रोबोटॅक्सी या वर्षी 8 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. टेस्लाच्या चाहत्यांना या रोबोटॅक्सीची प्रतिक्षा आहे. या रोबोटॅक्सीमध्ये खास फीचर्स मिळू शकतात. रोबोटॅक्सी लाँचिंगसाठी 8 ऑगस्ट हीच तारीख निवडण्यामागे देखील एक कारण आहे. चीनमध्ये 8 हा अंक शुभ मानण्यात येतो. त्यामुळेच ही तारीख निवडण्यात आल्याचे मस्कच्या एका फॉलोअरने स्पष्ट केले. त्याला एलॉन मस्क याने पण ट्विटरवर मान डोलावली आहे. त्याने या तर्काला सहमती दिली आहे.

एका वृत्तानुसार, टेस्ला दोन वाहनं बाजारात आणणार आहे. यामध्ये एका इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश आहे. त्याची किंमत टेस्लाच्या इतर वाहनांपेक्षा थोडी कमी असेल. तर दुसरे वाहन हे पूर्णपणे ऑटोमेटिक कार असेल. या कारमध्ये स्टेअरिंग व्हील आणि पॅडल नसेल. ही कार विना स्टेअरिंग आणि पॅडलची रस्त्यावर धावेल. टेस्लाच्या रोबोटॅक्सी लाँच करण्याची माहिती एलॉन मस्क याने त्याच्या एक्स हँडलवर दिली आहे. यामध्ये त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की टेस्लाची रोबोटॅक्सी बाजारात 8 ऑगस्ट रोजी, म्हणजे 8 तारखेला आणि 8 महिन्यात दाखल होणार आहे.

सध्या या कारविषयीची जास्त काही माहिती हाती आलेली नाही. अनेकांना या कारचे डिझाईन कसे आहे, याविषयीची उत्सुकता ताणल्या गेली आहे. सध्या समोर आलेल्या डिझाईननुसार, रोबोटॅक्सीचे डिझाईन हे Cybertruck सारखे असेल. कंपनी या रोबोटॅक्सीविषयीची माहिती लवकरच समोर आणणार आहे. एलॉन मस्क हे त्यांच्या रोबोटॅक्सीविषयी लवकरच माहिती देतील.

SL/ML/SL

5 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *