#जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ऍमेझॉनच्या बेझोस यांच्या खाली मस्क यांचे नाव; एकूण मालमत्ता 150 अब्ज डॉलर!

 #जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ऍमेझॉनच्या बेझोस यांच्या खाली मस्क यांचे नाव; एकूण मालमत्ता 150 अब्ज डॉलर!

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांच्या मालमत्तेमध्ये नुकतीच जबरदस्त वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, इलोन मस्क यांची संपत्ती 152 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. ते जागतिक श्रीमंतांच्या ब्लुमबर्गच्या प्रतिष्ठित यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहेत. आता ऍमेझॉनचे जेफ बेझोस या यादीमध्ये मस्क यांच्या पुढे आहेत. बेझोस यांची संपत्ती 182 अब्ज डॉलर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या यादीनुसार मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्याकडे 128 अब्ज डॉलर ची संपत्ती आहे आणि ते तिसर्‍या स्थानावर आहेत. त्याच वेळी, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांच्याकडे एकूण 111 अब्ज डॉलर ची संपत्ती आहे. या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 105 अब्ज डॉलर च्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचेच वॉरेन बफे यांच्याकडे 85.8 अब्ज डॉलर ची एकूण संपत्ती आहे आणि ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा देखील या यादीतील उर्वरित दहा सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश आहे. अंबानी यांची एकूण संपत्ती 76.8 अब्ज डॉलर इतकी आहे. तेलापासून ते दूरसंचार क्षेत्रात कार्यरत रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते (आरआयएल) अध्यक्ष आहेत.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांनी अशाप्रकारे उल्लेखनीय ​​यश प्राप्त केले आहे. परंतू फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत. या यादीत त्यांची एकूण मालमत्ता 140.2 अब्ज डॉलर दाखविण्यात आली आहे. 49 वर्षीय मस्क यांना इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार्‍या टेस्ला या कंपनीच्या माध्यमातून जमिनीवरील आणि रॉकेट उत्पादक स्पेसएक्सच्या माध्यमातून अंतराळातील परिवहन क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडविण्याच्या दृष्टीने काम करण्याचे श्रेय दिले जात आहे.
Tag-Elon Musk/Bloomberg Billioners Index/Amazon/Jeff Bezos
PL/KA/PL/12 DEC 2020

mmc

Related post