ई डी कडून मुश्रीफ यांच्या संदर्भातील कागदपत्रे आणि कर्मचारी ताब्यात
कोल्हापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही महत्त्वाची कागदपत्र सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी कसून चौकशीनंतर जप्त केली तसंच बँकेचे कार्यकारी संचालक डॉ ए बी माने यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.ED seizes documents and personnel related to Mushrif
तब्बल 36 तास कसून चौकशी केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेमधून ईडीचे अधिकारी बाहेर पडले.
कर्मचारी ताब्यात
सक्त वसुली संचालनालयाच्या पथकानं महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली असून कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ए बी माने यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
ML/KA/PGB
2 Feb. 2023