4 बड्या सुपारी व्यावसायिकांवर इडीची छापेमारी …

 4 बड्या सुपारी व्यावसायिकांवर इडीची छापेमारी …

नागपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण विदर्भात बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरात ईडी तर्फे चार बड्या सुपारी व्यापाऱ्यांचा ठिकाणांवर छापेमारी कारवाई करण्यात आली .ED raids on 4 big businessmen…

या कारवाईमध्ये व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्र हस्तांतरित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीर सडक्या सुपारी व्यवसायाचे पाळेमुळे कुठपर्यंत पोहचली आहे , कोण – कोण या व्यवसायात गुंतलेले आहे , सडक्या आणि प्रतिबंधीत सुपारीचा संपूर्ण माल कुठल्या कुठल्या ठिकाणी विकल्या जातो याची संपूर्ण चौकशी केली ईडी तर्फे करण्यात येत आहे .

आज सकाळी 6 वाजेपासून ईडी च्या अधिकाऱ्यांनी अतिशय गुप्त पद्धतीने एकाचवेळी विविध ठिकाणांवर छापेमारी करीत कारवाही सुरू केली. या कारवाईमुळे बेकायदा तंबाखू विकणारे आणि खर्रा,पान सुपारी करीता उपयोगात येणारी प्रतिबंधित सुपारी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.ED raids on 4 big businessmen…

ML/KA/PGB
1 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *