या कारणामुळे महाराष्ट्रातील पाऊस झाला गायब

 या कारणामुळे महाराष्ट्रातील पाऊस झाला गायब

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुलै महिन्यांत संपूर्ण राज्यभर प्रचंड कोसळलेल्या वरुण राजाने ऑगस्ट उजाडल्यापासून तुरळक बरसायला सुरुवात केली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पिके होरपळू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस झाल्याचे कारण हवामान विभागाने दिले आहे.

मात्र राज्यामध्ये 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे व त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुन्हा राज्यांमध्ये पाऊस बरसणार आहे.

जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यात पावसाने, उघडीप दिलेली होती व ही उघडीप साधारणतः 15 ते 16 तारखेपर्यंत होती व या कालावधीमध्ये शेतातील पिकांना पावसाची गरज भासू लागल्याने शेतकरी चिंतित झालेले होते व राज्यांमध्ये एकूण 18 ते 19 तारखेपासून काही भागात पावसाच्या सरी बरसू लागलेल्या आहेत. तसेच राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

SL/KA/SL
21 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *