माकडामुळे संपूर्ण देशातला वीजपुरवठा खंडित

 माकडामुळे संपूर्ण देशातला वीजपुरवठा खंडित

कोलंबो, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत काल एका माकडामुळे राष्ट्रीय आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. झालेली अभूतपूर्व स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे आख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. बीबीसीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं.

. एक माकड उड्या मारता मारता सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलं आणि वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला. कोलंबोच्या दक्षिण उपनगरांत असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात हा प्रकार घडला. परिणामी वीजपुरवठ्याची केंद्रीय यंत्रणाच बाधित झाल्यामुळे देशाच्या जवळपास सर्वच भागात वीजपुरवठा खंडित झाला.

काल सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता देशाच्या अनेक भागात वीज गायब झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येईपर्यंत जवळपास संपूर्ण देशातून या तक्रारी दाखल झाल्या. पुढचे जवळपास तीन तास हा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी श्रीलंकेतील प्रशासन प्रयत्न करत होते.

SL/ML/SL10 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *