डॉ गोऱ्हेनी केला कार्यकारिणी चा सत्कार
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवीन कार्यकारिणी चा सत्कार आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला.Dr. Gorheni felicitated the Executive Committee
विधानवनाच्या पत्रकार कक्षात झालेल्या एका अनौपचारिक गप्पा कार्यक्रमात डॉ गोऱ्हे यांनी विधिमंडळ कामकाजाबाबत पत्रकारांशी गप्पाही मारल्या. विधिमंडळ सुरू असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, कामकाजाची पद्धत, त्याबाबतच्या सूचना , प्रशिक्षण आदी अनेक विषय यात होते.
वार्ताहर संघाच्या अध्यक्षा सह संपूर्ण कार्यकारिणी ला डॉ गोऱ्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यावेळी उपस्थित होते.
ML/KA/PGB
16 Feb. 2023