राजरत्न पुरस्काराचे वितरण
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम ) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजरत्न पुरस्कार 2023 चे वितरण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम) व श्रीमंत डॉक्टर राजेंद्र भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हमरीतुमरीच्या प्रसंगी नागपूरकर भोसल्यांनी समंजसपणा दाखवत पेशव्यांसमोर माघार घेतली आणि वाद टळला. असा इतिहासाचा दाखला देत, असाच समंजसपणा पुढे दाखविला गेला असता तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळेला व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत दक्षिण भारत मुक्त झाला तर नागपूरकर भोसले यांच्या काळात पूर्व भारत परकीय मुक्त झाला असेही ते म्हणाले.
ML/KA/SL
15 Feb. 2023