अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला प्रचंड प्रतिसाद
सातारा दि १ : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सातारा येथे सुरू झाले. संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला राजवाडा येथून सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील व साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ दिंडीत विविध शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला होता. राजवाडा, मोती चौक, पोवई नाका, एसटी स्टँड मार्गे,
संमेलन स्थळापर्यंत ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली.ML/ML/MS