मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीसाठी आझाद मैदानात धरणा आंदोलन

 मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीसाठी आझाद मैदानात धरणा आंदोलन

मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अल्पसंख्याक घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारने बंद केली आहे. ती योजना पूर्वत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी स्कॉलरशिप जनआंदोलन कमिटीच्या वतीने आज डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई च्या आझाद मैदानात धारणा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शाळकरी विध्यार्थी, महिला,सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भारत सरकारने या वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसीएस आणि अल्पसंख्याकांना दिली जाणारी इयत्ता पहिली ते आठवी पर्यतची शिष्यवृत्ती रद्द केली आहे. तसेच सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप ही अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही, या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ही शिष्यवृत्ती त्वरित पूर्ववत करण्यात यावी . या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहोत. जो पर्यत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.अशी माहिती डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.Dharna protest at Azad Maidan for pre-matric scholarship

अल्पसंख्याक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी 2006 साली अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनासाठी ही मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना होती.३० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवण्यात आली.दरवर्षी 30 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात असे. मात्र ही शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण ही वाढले आहे. प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती तसेच मौलाना आझाद फेलोशिप समाजातील या सर्व असुरक्षित घटकांना त्वरित पुनर्संचयित कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा असे डॉ. मुणगेकर म्हणाले.

ML/KA/PGB
05 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *