राष्ट्रवादाबरोबर विकास आणि गरिबांचे कल्याणकारी राज्य ही भाजपची ओळख

 राष्ट्रवादाबरोबर विकास आणि गरिबांचे कल्याणकारी राज्य ही भाजपची ओळख

नाशिक, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवी दिशा दिली आहे राष्ट्रवाद ही भाजपची ओळख होती आता त्याच बरोबर विकास आणि गरिबांचे कल्याण करणारे राज्य अशी ओळख मिळाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची संपर्क सातत्याने ठेवणे आवश्यक आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केले.

प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक कालपासून नाशिक मधील त्रंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रोसी मध्ये सुरू झाली. त्यावेळी उदघाटन सत्राच्या प्रसंगी फडणवीस बोलत होते .

सर्वसामान्य नागरिकांना काय हवे याचा विचार करून आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने योजना राबवले आहेत मात्र हा कनेक्ट कायम राहिला पाहिजे असे फडणवीस म्हणाले. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने 18 ते 25 वयोगटातील तरुण वर्गाला केंद्रित करून त्यांना पक्षाशी जोडले पाहिजे. या वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले परिवर्तन समजावून सांगितले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.Development and welfare state of the poor along with nationalism is the identity of BJP

आगामी निवडणुकांमध्ये समाज माध्यमे महत्वाची असून त्यामुळे समाज माध्यमांवर सातत्याने सक्रिय राहिले पाहिजे असे सांगताना जे समाज माध्यमावर सक्रिय नसतील अशांना भविष्यात उमेदवारी नाकारण्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले.

या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे , राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह पक्षाचे मंत्री आमदार तसेच महाराष्ट्रातून आलेले जिल्हाध्यक्ष सहभागी आहेत. आज या बैठकीचा समारोप होणार आहे

ML/KA/PGB
11 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *