सुकन्या समृद्धी योजनेची दोन दिवसात 27 हजार 500 खाती

 सुकन्या समृद्धी योजनेची दोन दिवसात 27 हजार 500 खाती

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव ह्या महत्वाकांक्षी अभियाना अंतर्गत तसेच सध्या सुरू असलेल्या अमृत्पेक्स प्लस कार्यक्रम अंतर्गत भारतीय डाक विभागाने 9 आणि 10 फेब्रुवारी चे दरम्यान, सुकन्या समृध्दी योजनेचे संपूर्ण देशात 7.5 लाख खाते काढण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.27 thousand 500 accounts of Sukanya Samriddhi Yojana in two days

मुलींचे उज्वल भवितव्य तसेच तिचे उच्च शिक्षणासाठी आणि मुलींचे विवाहासाठी हे एक अत्यंत महत्वाचे खाते उघडणे सर्व पालकांसाठी खूपच गरजेचे आहे. फक्त 250 रुपयांमध्ये हे खाते उघडल्या जाते, ज्यात सगळ्यात जास्त व्याज मिळते आणि रकमेचा परतावा पण खूपच छान मिळतो. ह्या दोन दिवसात नागपूर क्षेत्राने जवळपास 27 हजार 500 च्या वर खाते उघडल्याची माहिती नागपूर विभागाच्या जनरल पोस्टमास्तर शोभा मधाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळेला नागपूर शहरातील निवडक सुकन्या ह्यांना या योजनेचे पासबुक प्रदान करणयात आले तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा इतवारी येथील पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

ML/KA/PGB
11 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *