उच्च न्यायालयाची मुख्यमंत्र्यांना क्लीन चीट
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर मधील भूखंड नियमित केल्याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेला खुलासा न्यायालयाने स्वीकारला आहे आणि संबधित प्रकरण बंद केलं आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.Deputy Chief Minister Devendra Fadnavis
उच्च न्यायालयाने यासंदर्भात केलेल्या आदेशातील काही भाग वाचून दाखवत त्यांनी न्यायालयाने सरकारला आरोपात घेरले नाही असं स्पष्ट केलं, सदर भूखंड नियमित करण्यासाठी कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा ही न्यायालयाने सरकारला दिली असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं, यामुळे विरोधकांनी कुभांड रचले मात्र तेच आता तोंडावर आपटले आहेत असंही ते म्हणाले.
ML/KA/PGB
22 Dec .2022