शरद पवारांवरील वक्तव्यावरून वंचित – सेनेत खटके

 शरद पवारांवरील वक्तव्यावरून वंचित – सेनेत खटके

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरद पवार हे भाजपचे समर्थक असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे सेना नेते आणि आंबेडकर यांच्यात चांगलेच खटके उडाले आहेत.Deprived of statements on Sharad Pawar – Sena cases

प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे आणि पवारांवर टीका करताना विचार करावा असे संजय राऊत यांनी आज म्हटले , यावर कोण राऊत असा प्रति सवाल आंबेडकरांनी करत युती होण्याच्या दोन दिवसात त्याचे भविष्य निश्चित केले आहे.

शरद पवार हे महा विकास आघाडीचे नेते आहेत, आघाडीवर टीका करताना आंबेडकरांनी सांभाळून बोलावे असे राऊत म्हणाले , त्यावर राऊत हे आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत , त्यांचा सल्ला मी मानणार नाही, उध्दव ठाकरे यांनी तो दिला असता तर मानला असता असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

मी त्यांना सल्ला दिलाच नाही पण त्यांनी आघाडीला त्रास होईल असे वागू नये असे पुन्हा आज संध्याकाळी राऊत म्हणाले. मी शिवसेनेचा नेता , मुख्य प्रवक्ता आणि उध्दव ठाकरे यांचा सहकारी आहे त्यामुळे माझे हे वैयक्तिक मत नाही तर पक्षाचे मत आहे असे सांगितल्याने वंचित आणि सेना यांच्या युतीत पहिल्या दोन दिवसातच मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे.

ML/KA/PGB
27 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *