संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलडाणा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेगाव निवासी संत गजानन महाराज यांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 700 वारकरी पायदळ वारीत सहभागी झाले असून 33 दिवसांचा पायी प्रवास करत आषाढ महोत्सवासाठी ही शेगावीची वारी निघाली आहे.
चंद्रभागेच्या तीरी पंढरपुरात होत असलेल्या आषाढ महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी निघाली आहे. आज सकाळीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. सातशे वारकऱ्यांना घेऊन ही पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात शेगाव ची ही वारी मजल दर मजल करत आषाढ महोत्सवासाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ML/ML/SL
13 June 2024