कच्च्या तेलाच्या किमतीत घट, भारताला दिलासा

 कच्च्या तेलाच्या किमतीत घट, भारताला दिलासा

मुंबई,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

मु इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन महिना झाला आहे. असे असतानाही कच्च्या तेलाच्या किंमतीने दोन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली गेला आहे. कच्च्या तेलाचे मोठे आयातदार असलेल्या भारतासह त्या सर्व देशांना किंमती कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या या घसरणीमुळे सरकारी तेल कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीतून या कंपन्यांना होणारा तोटा वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आयात स्वस्त होऊन हा तोटा भरून निघण्यास मदत होईल. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून दर कमी करण्याचा मार्ग तयार केला जाईल, ज्याचे संकेत सरकारकडून आधीच दिले जात आहे.

वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ऑइल (WTI Crude Oil) किंमत 2 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 80 डाॅलरच्या खाली 79.20 प्रति बॅरल डाॅलर झाली. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे आणि 2.04 टक्क्यांच्या घसरणीसह ते प्रति बॅरल 83.44 डाॅलरवर व्यवहार करत आहे.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आरबीआयला मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआयने ऑक्टोबरमध्ये सादर केलेल्या पतधोरणात म्हटले होते की, आगामी काळात चलनवाढ एल निनो परिस्थिती, जागतिक अन्नधान्याच्या किमती आणि ऊर्जेच्या किमतींवर अवलंबून असेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार हे बाह्य कारणांमुळे आहेत. अशा परिस्थितीत या सर्व डेटावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.

SL/KA/SL

8 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *