पालिका रुग्णालयात मृत्यूचे थैमान, एकाच दिवशी १८ मृत्यू

 पालिका रुग्णालयात मृत्यूचे थैमान, एकाच दिवशी १८ मृत्यू

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाण्याच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात कळवा इथे दोन दिवसापूर्वी सहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल दिवसभरात पुन्हा १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Death toll in municipal hospital, १८ deaths in a single day

दोनच दिवसांपूर्वी एका रात्री सहा रुग्ण दगावले होते . या रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत , डॉक्टरांनी लक्षच दिले नाही असा नातेवाईकांचा आरोप होता. ही घटना ताजी असतानाच काल दिवसभरात पुन्हा १८ आणखी रुग्ण दगावले आहेत. यामुळे एकच खळबळ माजली असून पालिकेचे हे रुग्णालय शवागार बनले आहे. या घटनेने सर्व सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

हे सर्व रुग्ण बाहेरून अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले होते, त्याबाबत अधिकची माहिती लवकरच दिली जाईल असे पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी स्पष्ट केले आहे. सर्व मृत रुग्णांची तपशीलवार माहिती जमा केली जाते आहे असे ते म्हणाले.
मात्र या रुग्णालयात अत्यंत बजबजपुरी माजली असून, डॉक्टरांची अत्यंत अपुरी संख्या , उपचारांचा अभाव असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ML/KA/PGB
13 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *