केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 लाख रुपये!
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त येऊ शकते. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र तरीही एका आघाडीवर त्यांच्यासाठी निराशाच आहे. कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबतची (Dearness allowance arrears) अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र या महिन्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्त्या व्यतिरिक्त अनेक मोठे फायदे दिले आहेत. परंतु महागाई भत्ता थकबाकीचे प्रकरण 18 महिन्यांपासून प्रलंबित आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (जेसीएम) चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, काऊन्सिलने सरकारकडे मागणी केली आहे की महागाई भत्ता देताना 18 महिन्याच्या प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता थकबाकीचाही (Dearness allowance arrears) एकाचवेळ निपटारा करण्यात यावा.
नॅशनल काऊन्सिल ऑफ जेसीएम, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेंनिग (डीओपीटी) आणि वित्तमंत्रालय यांच्यात थकबाकीवर चर्चा झाली. मात्र, कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. कर्मचारी अजूनही मागणीवर ठाम असून सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, लवकरच याबाबत मंत्रिमंडळ सचिवांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, देशात एकूण 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 60 लाख निवृत्ती वेतनधारक आहेत.
नॅशनल काऊन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, श्रेणी-1 कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी (Dearness allowance arrears) 11,880 रुपये ते 37,554 रुपये आहे. तर, श्रेणी-13 (7वी सीपीसी मुळ वेतन श्रेणी 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये) किंवा श्रेणी-14 (वेतन श्रेणी) साठी गणना केली गेली तर कर्मचार्याच्या हातात महागाई भत्ता थकबाकीचे 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपये दिले जातील.
वास्तविक, श्रेणी1 च्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11,880 ते 37,554 रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, श्रेणी 13 च्या कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 1,23,100 ते 2,15,900 रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच वेळी, श्रेणी 14 च्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम 1,44,200 ते 2,18,200 रुपये त्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते.
18 महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला आहे, आता पंतप्रधान मोदी थकबाकीबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे थकबाकीबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत. जर पंतप्रधान मोदींनी 18 महिन्यांच्या थकबाकीला हिरवा झेंडा दाखवला, तर सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात मोठी रक्कम येईल.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचला आहे. 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतन धारकांना त्याचा लाभ मिळत आहे.
This can be heartening news for the central staff. There is an atmosphere of happiness among the employees due to the increase in dearness allowance, but there is still disappointment for them on the one hand. Expectations of 18 months dearness allowance arrears of employees have not been met yet. However, the issue is expected to be discussed this month.
PL/KA/PL/22 JAN 2022