विधान परिषदेत पुन्हा दाऊद इब्राहिम गाजला

नागपूरमुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यामध्ये मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप विरोधी पक्षाचा सदस्यांनी केल्या नंतर सभागृहात गोंधळ झाला. सदस्य वेल मध्ये येऊन गदारोळ करीत होते. या गोंधळानंतर 10 मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले आणि पुन्हा सुरू होताच सभात्याग केला.
तहकुबी नंतर सभागृह सुरू झाल्यानंतरही विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी सुरू राहिली. या घोषणाबाजीत मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, या संदर्भात सरकारने SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही.
सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांचा यामध्ये सहभाग नाही असेही देसाई यांनी सांगितले Dawood Ibrahim became popular again in the Legislative Council
ML/KA/PGB
18 Dec 2023