राज्याच्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख….

 राज्याच्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख….

दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या सत्ता संघर्षावर ची सुनावणी पुन्हा पुढच्या तारखेवर गेली असून आता १४ फेब्रुवारीला नवीन घटनापीठ की आहे तेच ठरून पुढील सुनावणी घेण्यात येईल.

राज्यात शिवसेनेत उभी फूट पाडून सत्तापालट झाला, त्यावर अनेक याचिका गेल्या वर्षी जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या , राज्यात नवीन सरकार येऊन सहा महिने झाले तरी ते कायदेशीर की बेकायदेशीर यावरील सुनावणी अजून सुरूच आहे.

या सर्व याचिकांवरील सुनावणी साठी पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले, त्यावर सुनावणी सुरू झाली मात्र हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापिठाकडे सोपवून त्यावर सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली , त्यावर अपले लेखी म्हणणेही सादर केले, मात्र शिंदे गटाचे त्यावरील उत्तर काल रात्री दाखल झाले.

आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून नवीन पिठाची मागणी झाली , कपिल सिब्बल यांनी त्याबाबत म्हणणे ही मांडले मात्र न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेऊ असे सांगत पुढची तारीख दिली.

यामुळे आता सात सदस्यीय नवीन घटनापीठ स्थापन होईल की आहे त्या घटना पिठाकडे सुनावणी होईल हे १४ फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल, जुनेच पीठ कायम राहिले तर मात्र सलग सुनावणी करण्यात येईल असेही आज स्पष्ट करण्यात आले आहे.Date Pay Date on State Power Struggle…

ML/KA/PGB
10 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *