मुंबईतील डब्बेवाले जाणार सुट्टीवर

 मुंबईतील डब्बेवाले जाणार सुट्टीवर

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील कार्यालयांमध्ये ठरलेल्या वेळी डबा नेऊन देण्याचं काम अविरतपणे करणारे मुंबईचे प्रसिद्ध जगप्रसिद्ध डबेवाले आता सहा दिवसांची सुट्टी घेणार आहेत. ३ ते ९ एप्रिल या कालावधीत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर असतील. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा हे डबेवाले आपलं डबे पोहचवण्याचं काम सुरू करणार आहेत.

मुंबईत काम करणारे हे डबेवाले मुख्यतः मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला, संगमनेर भागातल्या गावांमधले आहेत. या ठिकाणी आता कुलदैवतांच्या यात्रा सुरू होती. या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतले हे डबेवाले सुट्टी घेणार आहेत.३ ते ९ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतले बहुसंख्य डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून डबेवाले आपलं काम पुन्हा सुरू करतील.गावांमधल्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी हा ब्रेक घेतला आहे.

डबेवाल्याच्या या सुट्टीमुळे मुंबईतल्या नोकरदारांची या सहा दिवसांत काहीशी गैरसोय होणार आहे. मात्र याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशन दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच या सहा दिवसांच्या कालावधीतला पगार कापू नये अशीही विनंती डबेवाला असोसिएशनने केली आहे. याआधी २०१९ मध्ये डबेवाले चार दिवसांच्या सुट्टीवर गेले होते.

SL/KA/SL

31 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *