या राज्यात ‘दही’ ठरले भाषिक अस्मितेचे कारण

चेन्नई, दि.३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्य आपल्या भाषेबाबत खुपच जागरुक असतात. तामिळनाडूत आता खाद्यपदार्थांच्या नावांनाही भाषिक वादात सापडावे लागत आहे. राज्याच्या दूधउत्पादन संघाच्या दह्याच्या पाकिटांवर आता दही असा शब्द लिहिला जाणार नाही, असे दूधमहासंघाने स्पष्ट केले आहे.
दही हा शब्द हिंदी असल्याने तो छापला जाणार नाही. त्याऐवजी, तामिळ भाषेतील तायिर हा शब्द उपयोगात आणला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एफएसएसएआय या केंद्रीय संस्थेने दहय़ाच्या पाकिटांवर कर्डस् असे न छापता दही असे छापावे असा आदेश काढला होता. मात्र, हा तामिळनाडूवर हिंदी थोपण्याचा प्रकार आहे अशी टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली होती. त्यानंतर दही या शब्दाच्या विरोधात काही लोकही रस्त्यावर उतरले होते.
दही आणि कर्ड हे भिन्न पदार्थ आहेत. ते समान नाहीत, अशी भूमिका तामिळनाडूच्या दुग्धविकास मंत्र्यांनी घेतली आहे. तामिळनाडूतील भाजप नेतेही केंद्राच्या या धोरणाला विरोध करीत आहेत. ही अधिसूचना मागे घेण्यात यावी असा आग्रह तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अण्णामलाई यांनी केला आहे. एकंदर, या दही प्रकरणाने राज्यातील भाषावादाला नवीन कारण मिळवून दिल्याचं दिसत आहे.
SL/KA/SL
31 March 2023