CRPF महिला कमांडो बाईक रैली जगदलपूरकडे रवाना

 CRPF महिला कमांडो बाईक रैली जगदलपूरकडे रवाना

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 25 मार्च सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार आहे, आझादी चा अमृत महोत्सव तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला सशक्तिकरणाचा देशात प्रसार करण्याचा उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमंडोच्या वतीने काढण्यात आलेल्या महिला कमांडो च्या बाईक रॅलीला
एअर मार्शल विभास पांडे यांनी कस्तुरचंद पार्क येथून हिरवी झेंडी दाखवून जगदलपुर साठी रवाना केले.

दिल्लीवरून निघालेली ही बाईक रॅली देशाच्या विभिन्न राज्याचा प्रवास करीत नागपुरात पोहचल्यावर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज सकाळी कस्तुरचंद पार्क येथून महिला कमांडो बाईक रैलीला रवाना करण्यापूर्वी कस्तुरचंद पार्क मैदानावार सीआरपीएफ च्या महिला जवानांनी आपल्या शस्त्राद्वारे स्टंट तसेच महिला कमांडो यांनी बाईक स्टंट दाखवित उपस्थितांची मने जिंकली. यावेळेला पाईप बँडचे देखील सादरीकरण करण्यात आले.CRPF Women Commando Bike Rally leaves for Jagdalpur Kade

या वेळेला CRPF च्या महिला कमांडो द्वारे विविध चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाला एअर मार्शल विभास पांडे, DIG CRPF नागपूरचे प्रशांत जंभोलकर, कीर्ती जंभोलकर, रिचिरा पांडे, डॉ.अमित समर्थ, IG सिव्हिल पोलीस नागपूरचे शेरिंग दोरजे, DIG गडचिरोली संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नागपूरकर देखील मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते.

ML/KA/PGB
19 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *