कोव्हिड कालावधीत लोकांचा कर्ज घेण्याकडे कल
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (covid-19) गेल्या वर्षी लोकांच्या कर्ज घेण्यामध्ये एक नवा कल दिसून आला. महानगरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज मागितले. कामकाजासंदर्भात बदललेल्या परिस्थितीत वॉशिंग मशीन, डिश वॉशर यासारख्या दैनंदीन घरगुती वस्तूंसाठी कर्जाची मागणी वाढली. त्याशिवाय लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या रिमोट वर्किंग आणि ई-लर्निंगला मदत करणार्या गॅझेटसाठीही कर्जाची मागणी वाढली आहे. भव्य विवाहसोहळे आणि सहलींवर खर्च करण्यासाठी कर्जाची मागणी कमी झाली. इंडियालँड्स नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बॉरोअर पल्स अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
18 टक्के लोकांनी उपचारासाठी कर्ज मागितले
18 percent asked for a loan for treatment
मागील वर्षी 25 टक्के लोकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर 18 टक्के लोकांनी उपचारासाठी कर्ज मागितले होते. या व्यतिरिक्त कोव्हिड आणि त्यामुळे झालेल्या सामाजिक व आर्थिक बदलांमुळे 17 टक्के लोकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी कर्ज मागितले होते.
कोव्हिड (covid-19) दरम्यान लोकांचा कर्ज घेण्याचा कल माहिती करुन घेण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे डिजिटल प्लॅटफॉर्मने आपला अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षण 25 मार्च 2020 ते 20 मार्च 2021 दरम्यान वर्ग 1 आणि वर्ग 2 शहरांमध्ये 21 ते 55 वर्षे वयोगटातील देशातील दीड लाख कर्जदारांवर करण्यात आले आहे. या अहवालात 10,000 रुपयांपासून ते 50,00,000 रुपयांपर्यंत कर्ज घेणार्या महिला आणि पुरुषांचा (Borrowers) समावेश आहे.
कर्ज मागणी करणार्य़ांमध्ये सर्वाधिक दिल्लीचे
Delhi has the highest number of loan seekers
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, कर्ज मागणार्यांमध्ये सर्वाधिक लोक दिल्लीचे होते, परंतु वर्ग 2 शहरातील कर्ज घेणार्यांच्या (Borrowers) संख्येत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चैनीच्या वस्तू आणि सेवांवरील खर्च कमी झाल्यामुळे वर्ग 1 शहरांमध्ये कर्जाची मागणी कमी होती. या अहवालात एक विशेष मुद्दा समोर आला आहे की सुमारे 52 टक्के कर्जदार वय 25-35 वर्षे वयोगटातील होते.
मुंबईतील 27 टक्के कर्जदारांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता
27% of borrowers in Mumbai wanted to start their own business
सर्वेक्षणानुसार कर्ज घेणार्यांच्या गरजा वेगवेगळ्या होत्या. दिल्लीतील 31 टक्के कर्जदारांना (Borrowers) वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर सारख्या घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करायच्या होत्या. 25 टक्के कर्जदार असे होते ज्यांना कोव्हिडमुळे अचानक आलेला खर्च भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती.
मुंबईतील कर्जदार (27 टक्के) स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मागणी करत होते, तर 15 टक्के लोकांना लॅपटॉप, टॅब्लेट इत्यादी खरेदी करायचे होते. बंगळुरु बद्दल बोलायचे झाले तर इथल्या 28 टक्के लोकांना इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी कर्ज घ्यायचे होते. येथील 12 टक्के लोकांनी कौशल्य वाढविण्याच्या अभ्यासक्रमासाठीच्या कर्जासाठी अर्ज केला होता. यावरून लोकांचे लक्ष रिकाम्या वेळेचा सदुपयोग कौशल्य वाढवण्याकडे होते असे अनुमान काढता येऊ शकते.
गेल्या वर्षी कर्जासाठी अर्ज करणार्यांमध्ये आणखी एक रुचीपूर्ण प्रवृत्ती दिसून आली. सर्वेक्षणानुसार, मागील वर्षी वर्ग -1 शहरांपेक्षा (46 टक्के) अधिक वर्ग -2 शहरांमधील (54टक्के) लोकांनी कर्ज मागितले. वर्ग 2 शहरांमध्ये कर्जासाठी सर्वाधिक अर्ज कोईम्बतूर, चंदीगड, लखनऊ, इंदूर आणि कोची येथून होते.
Covid (covid-19) last year saw a new trend in people borrowing. In metropolitan areas, large numbers of people applied for personal loans to start their own businesses. In the changed working conditions, the demand for loans for daily household items like washing machines, dish washers increased. In addition, there is a growing demand for loans for gadgets that support remote working and e-learning, such as laptops and tablets.
PL/KA/PL/24 MAR 2021