लाल किल्ला हल्ला प्रकरणातील दोषीची फाशी कायम
नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील लाल किल्ल्यावर २००० मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषी मोहम्मद अशफाक आरिफला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली. मुख्य न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. Red Fort Attack Case: Court confirms death penalty to Mohammad Arif in 2000 Red Fort attack case.
दरम्यान, लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी (Terrorist) आरिफ 22 डिसेंबर 2000 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील लष्कराच्या बॅरेकवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. या हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आरिफला दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने २००५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी २००७ साली दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला होता. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोषीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
3 Nov. 2022