कॉटनग्रीन रेल्वे स्थानक लवकरच स्कायवॉकला जोडणार
मुंबई, दि २५
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाला स्कायवाकला जोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे.
परंतु मागील काही महिन्यांपासून तेथील काम बंद असल्यामुळे भायखळा, काळाचौकी, फेरबंदर, अभ्युदय नगर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. स्थानकावर चढताना नागरिकांना वडाळा दिशेकडून चढून पुन्हा मागे यावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ हा लागत होता. त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत होती. यासाठी मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी जाहीर फलक लावून 25 नोव्हेंबर पर्यंत जर हा ब्रीज खुला झाला नाही तर मनसे पक्षाच्या माध्यमातून प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून
रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने फेरबंदर येथील मनसे कार्यलयात येऊन स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.त्यानुसार त्यांनी लवकरच नागरिकांना कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी हा ब्रीज रहादारीसाठी खुला होईल आणि पुढील काम देखील लवकर पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली. यावेळी
मनसे प्रभाग २०८ चे शाखाध्यक्ष
किरण टाकळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS