कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार उचलणार पावले – के.व्ही. सुब्रमण्यम

 कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार उचलणार पावले – के.व्ही. सुब्रमण्यम

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) के व्ही सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या (corona virus) दुसर्‍या लाटेचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेला (Economy) चालना देण्यासाठी सरकार आणखी उपाययोजना करू शकते. त्याचबरोबरच सुब्रमण्यम यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात केलेल्या विविध उपाययोजना लक्षात घेऊन नव्या प्रोत्साहन पॅकेजवर विचार केला जाईल. एप्रिल-मे महिन्यात साथीच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी सूचना काही उद्योग संघटनांनी केली आहे. सुब्रमण्यम यांची प्रतिक्रीया या सूचनांच्या पार्श्वभुमीवर आली आहे.

देशाला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा उत्पादन तोटा
The country has a production loss of around Rs 2 lakh crore

रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) एका मूल्यांकनानुसार साथीच्या (corona virus) दुसर्‍या लाटेमुळे देशाला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा उत्पादन तोटा सहन करावा लागला आहे. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, गेल्यावर्षीही आम्ही अधिक उपाययोजना करण्यास तयार होतो. परंतु जेव्हा आपण प्रोत्साहन पॅकेजबद्दल बोलतो तेव्हा गेल्या वर्षी आणि या वर्षात खूप फरक आहे. ही बाब अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, मागचा अर्थसंकल्प साथीच्या आधी सादर करण्यात आला होता. परंतु या वेळचा अर्थसंकल्प साथ सुरु असताना सादर झाला आहे. त्यात काही बाबींचा समावेश आधीच करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीची गती वाढवण्याचे उद्दीष्ट
Aims to accelerate the recovery of the economy

पायाभूत सुविधांवरील (Infrastructure) खर्चावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. यामुळे बांधकाम क्षेत्रातील घडामोडी वाढतात आणि शेवटी असंघटित क्षेत्रात रोजगार निर्माण होतो. गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत हे दिसून आले. ते म्हणाले की, सरकारच्या भांडवली खर्चामुळे चौथ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सुब्रमण्यम यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेची (Economy) पुनर्प्राप्ती वेगवान होईल हे सुनिश्चित करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यासाठी सरकार जे काही करण्याची आवश्यकता आहे ते करेल. गरिबांच्या अन्नसुरक्षेबाबत मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले की सरकारने 80 कोटी लोकसंख्येसाठी मुख्य अन्न कार्यक्रम नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. ते म्हणाले की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या विस्तारासाठी 70,000 कोटी रुपये खर्च होतील. सुब्रमण्यम म्हणाले की मोफत लस हा आणखी एक महत्त्वाचा आर्थिक उपाय आहे.
Chief Economic Adviser (CEA) KV Subramaniam said the government could take further steps to boost the economy affected by the second wave of corona virus. At the same time, Subramaniam said that the new incentive package would be considered in view of the various measures taken by Finance Minister Nirmala Sitharaman in the 2021-22 budget.
PL/KA/PL/21 JUNE 2021

mmc

Related post