कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात, २८८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी

 कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात, २८८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी

बालासोर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २८८ इतकी झाली आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदींनी कॅबिनेट मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत जखमींना आणि कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले. “सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. सर्व तपासाचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार आहे. त्यांना सोडणार नाही. ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. येथील नागरिकांनाही संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचं काम केलं,” अस पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान भावूक झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ही दुर्दैवी घटना असून, मनाला विचलित करणार अपघात आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालाय, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. “

SL/KA/SL

3 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *