सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रक्षाबंधनाचा सण आहे. या निमित्ताने याच्याशी संबंधित विविध ऐतिहासिक कथा, कहाण्या सांगितल्या जातात. भावाबहिणीतील प्रेमाचा अतुट बंध दृढ करणाऱ्या या सणाला देशातील प्रत्येक प्रांतानुरुप अनेक कथा निगडीत आहेत. मात्र या हिंदू सणाचा संबंध मुस्लीम बादशहाशी जोडल्याने राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर त्यांना ट्रोलही केलं जात आहे.
राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, राणी कर्णावती अडचणीत असताना तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायूला एक धागा पाठवला. अडचणीत असलेल्या बहिणीचे संरक्षण करा, असा संदेश दिने पाठवला होता. हुमायूनला हा धागा नेमका कशासाठी आहे, हे कळले नाही.
त्याला स्थानिकांनी सांगितले की, बहिणीने भावाला मदतीसाठी बोलावण्याचे हे संकेत आहेत. हुमायूला राणी कर्णावतीला वाचवणे आपले कर्तव्य असल्याची जाणीव झाली आणि तो निघाला. मात्र, त्याला पोहचण्यास विलंब झाला. तो पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आताही ही पंरपरा देशभरात पाळली जाते. म्हणून बहीण कितीही अंतरावरून भावाला राखी बांधायला जाते. यावरून सोशल मिडीयावर सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा सणाचा संबंध मुघल साम्राज्याशी जोडला आहे, असा आरोप करत टीका होत आहे.
SL/ML/SL
19 August 2024